Featured Post

Marathi Kavita: माझा पाऊस


वाटलं लिहावं काहीतरी कित्ती दिवस झाले
मन भरून आलं असे कितीतरी पाऊस गेले


भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही
असे म्हटलं तरी चालेलं कारण पाऊस सोडून, त्याला कोणीच पाहिलं नाही


तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच
आठवणीतलं मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच


रिमझिम टपटप धोधो आणि सरसर
कित्तीतरी रूपं त्याची सारी तशी सुंदर


मला मात्र भावतं त्याचं धोधो पडणं
हातच काहीच नं राखता थेट जाऊन भिडणं


त्याच्या येण्याबरोबर जाग्या होतात साऱ्या स्मृती
आठवतात काही जोडलेली तर काही पुसट होत गेलेली नाती


वाफाळलेला चहा, कधी सोबत कवितेचं पुस्तक
तर कधी नुसत बसून त्याला न्याहाळायचं एकटक


गरम भजी वडा आणि मित्रांसोबत केलेली धमाल
तर कधी गाणं ऐकताना त्यावर सहज धरलेला ताल


उडालेली तारांबळ कधी जवळ नव्हती म्हणून छत्री
तर आठवणीतली संध्याकाळ कुणासोबातची जवळ एकच होती जेव्हा छत्री


कित्येक क्षण दिलेत त्याने भरभरून जगण्याचे
रोजच्या व्यापातून स्वतःला थोडं वेगळ काढून बघण्याचे


काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच कि हिवाळे अन उन्हाळे
पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातच ना " मी पाहिलेत इतके पावसाळे"


                                                     -कल्याणी बोरकर
कल्याणी बोरकर यांचा 'नजर' हा काव्यसंग्रह इथे विकत घेऊ शकता buy नजर बुक कॉपी on googleplay More Marathi Poems


Comments

Popular posts from this blog

My next book is for all of you: Untold Nakshatra Jyotish

The mystic meaning of Shree Saraswathi Yanthram

Vedic Astrology: Bhava Calculation or Calculation of Cusps

The milk of our second mother, Indian cow or ‘Gomatha’ (Most liked Post)

Vedic Astrology: Planetary Strengths or Graha Bala