गझल

एक गझल लिहितेय.ही गझल म्हणजे आर्त प्रेमाची एक छोटी गोष्ट आहे.थोडी एकतर्फी प्रेम सांगणारी.




छळू नको रे दु:ख मजला फार झाले
अश्रूही बघ अतासे फरार झाले

नजरा तुझ्या वाचुनी मी सर्व समजायचो
नजरेतुनी बोलणे आता हे फार झाले

उभ्या राहिल्या कित्येक भिंती अपुल्यामध्ये
मी त्या हरेक भिंतीमधील दार झाले

तुला दिसलेच नाही मी च्या पल्याड काही
अन माझ्या मनी उगीच दोनाचे चार झाले

तुज पाहण्यास  फिरणे असे अवती भवती
अन असणेही माझे बघ तुझी तक्रार झाले

मी तशी तुजला कधी कळलेच नाही
अन प्रेमही माझे मग कसे लाचार झाले

समजायचे समजून गेले मी शेवटी
अन बोलणेही आपुले, व्यवहार झाले

तोडिले मग बंध सारे मी निश्चयाने
लोक म्हणती अता मी, हुशार झाले

म्हणशी आता तू कळले तुला ते प्रेम माझे
पण मीचं आज त्या प्रेमातला नकार झाले

प्रेम कैसे मी पुन्हा फिरुनी करावे
काळजावर बघ किती हे वार झाले

छळू नको रे दु:ख मजला फार झाले
अश्रूही बघ अतासे फरार झाले


कल्याणी बोरकर





Popular posts from this blog

Marathi Kavita: माझा पाऊस

Basic Course on Vedic Astrology (Free)

The milk of our second mother, Indian cow or ‘Gomatha’ (Most liked Post)

Astrological analysis of Mr. Narendra Modi Part 1

Vedic Astrology: Calculation of Vimshottari Dasa