पाऊस

.....खरतर प्रत्येक वर्षीच तो येतो पण प्रत्येक पावसाळ्यात पावसाचे  पहील रूप पाहणे हे खूप सुंदर असतं.
त्याची वाट पाहणे, त्याने येण, आणि येताना त्याला  पहात पहात कविता लिहिणं म्हणजे खूप भारी वाटते
अशीच पहिल्या पावसाची नवीकोरी पहिली कविता ...कशी वाटतेय नक्की सांगा आणि खाली दिलेल्या लिंक वर ऐकताही येईल,
नको नकोसेच झाले बघ डोईवर ऊन
वाटे सोडेल का आभाळ आज त्याचे मौन

आग ओकणाऱ्या झळा भिनती रोमातून
तितक्यात ऐकू आली कानी ओळखीची धून

पक्षी झाले सैरभैर वारे वाहिले फिरून
आणि क्षणात दिसला तो येताना दुरून

ठरवले पहावे आज त्यावरी रागावून
थांबू  नयेच स्वागता जावे पाठ फिरवून

किती रे बघावी तुझी एखाद्याने वाट
डोळे सुकले रे माझे कोरडा झाला काठ

पण गाठलेच त्याने मला जाताना रागवून
आणि मनवले असे त्याच्यातच भिजवून'

झाले पाऊस पाऊस मग डोईचे ते ऊन
काळजात राहिला फक्त पाऊस भरून

असे असावेच काही ज्यात जाता यावे विरून
अन कशानेतरी काळीज असे यावेच भरून

जेव्हा नकोसे होईल मग कसलेही ऊन
तेव्हा बरसावे आपण पाऊस आपला होऊन
तेव्हा बरसावे आपण पाऊस आपला होऊन


कल्याणी बोरकर

Popular posts from this blog

The milk of our second mother, Indian cow or ‘Gomatha’ (Most liked Post)

Marathi Kavita: माझा पाऊस

Basic Course on Vedic Astrology (Free)

Vedic Astrology: Calculation of Vimshottari Dasa

Vedic Astrology: Planetary Strengths or Graha Bala