होळी
उधळीत रंग इतुके तू खेळतोस होळी
रंग कोणता मी ल्यावा रीतीच माझी झोळी

रंग लालचुटुक शोभे जितुका गुलाबास
तितुकाच आवडे मज जो रंग लाल मातीस

पिवळा धमक पाहावा ना ना फळा फुलांत
अन मनात  साठवावा समईतला प्रकाश

नारिंगी रोज सजतो पूर्वेकडे पहाटे
फळ रसदार नारिंगी ते पाहताच गार वाटे

शुभ्र धवल शोभतो बघ, उंच हिमशिखरात
खिडकीतुनी पाहावा पुनवेच्याही चंद्रात

मज भावते निळाई अथांग त्या नभाची
मखमल लपेटलेल्या त्या मोरपिसाऱ्याची

पावसात नाहलेली ती हिरवीगार अवनी
जणू तृप्त जाहलेली पर्जन्य अमृत पिउनी

श्याम तो दिसावा मिटल्या डोळा अंतरात
लपेटून घ्यावी मग मिट्ट काळोखी रात

असे रूप ते दिसावे मज नित्य सांजवेळी
अन भरून जावी माझी रितीचं ती झोळी

मी नित्य अनुभवावी ही तिचं तुझी होळीकल्याणी बोरकर

Popular posts from this blog

Marathi Kavita: माझा पाऊस

Basic Course on Vedic Astrology (Free)

The milk of our second mother, Indian cow or ‘Gomatha’ (Most liked Post)

Astrological analysis of Mr. Narendra Modi Part 1

Vedic Astrology: Calculation of Vimshottari Dasa