Vitamin Part 4

 #Vitamin

मागच्या लेखामध्ये 2 महत्वाचे प्रश्न आले. एक lactose intolerance बद्दल आणि दुसरा दूध आणि मधुमेह याच्या संबंधाबाबत.
साध्या भाषेत सांगायचे झाले तर Lactose intolerance म्हणजे दूध न पचणे. Lactose ही एक प्रकारची साखर दुधात असते. आपल्या शरीरात lactase नावाचे enzyme असते जे Lactose चे विघटन करायला मदत करते. ज्यांच्या शरीरात lactase चे प्रमाण कमी असते त्यांच्या पोटात Lactose चे विघटन होत नाही आणि ते मोठ्या आकड्यात जाते व त्यामुळे गॅसेसचा किंवा dysentery चा त्रास होऊ शकतो. (https://www.webmd.com/.../digestive-diseases-lactose...)
अगदी सामान्य माणसाला सुद्धा भरपूर दूध प्यायल्याने हा त्रास होऊ शकतो. मी स्वतः 7 लिटर flavored दूध एकाच दिवसात पिऊन याचा अनुभव घेतला आहे. lactose intolerance असलेल्यांना दूध अजिबात चालत नाही असे नाही त्यामुळे आपल्याला एका वेळी किती दूध चालते हे त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून ठरवले पाहिजे. अगदी एक थेंब सुद्धा दूध चालत नाही अशा व्यक्ती भारतात फार कमी असाव्यात.
आता diabetes बद्दल बोलू. दुधामध्ये Lactose आणि galactose अशी 2 carbohydrates असतात ज्यापासून साखर तयार होते. आपल्याला माहीतच असेल की almost सगळ्या carbohydrates मधून साखर तयार होते आणि पदार्थाच्या Glycemic index (GI) वरुन ठरते की तो पदार्थ diabetes साठी योग्य आहे की अयोग्य. दुधाचा व दह्याचा GI 55 किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यामुळे दूध diabetes करता इतर अनेक धान्यांपेक्षा उपयुक्त आहे.
यात विशेष म्हणजे low fat दुधाचा GI full cream दुधापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ low fat दूध diabetes करता full cream मिल्क पेक्षा जास्त घातक आहे.
Dr. दीक्षितांच्या प्रयोगांनुसार पातळ ताक प्यायल्यास शरीर insulin सुद्धा सोडत नाही त्यामुळे पातळ ताक diabetes मध्ये अतिशय उपयोगी आहे.
ज्यावेळी आपण दूध फोडतो तेव्हा त्यातील पाणी आणि चोथा वेगळा होतो. ह्या पाण्याला whey असे म्हणतात. ज्यावेळी आपण पनीर तयार करतो त्यावेळी जे पाणी बाजूला होते त्याला sweet whey असे म्हणतात तर ज्यावेळी श्रीखंडाचा चक्का तयार करतो त्यावेळी जे पाणी वेगळे होते त्याला sour whey असे म्हणतात. आजकाल जे whey protin मिळते ते ह्याच पाण्यापासून तयार करतात. हे पाणी अत्यंत पौष्टिक (protin rich) असते. B12 Vitamin water soluble असल्याने या पाण्यात B12 भरपुर प्रमाणात असते. त्यामुळे ते अजिबात टाकून देऊ नये. या पाण्याचा diabetes मध्ये सुद्धा ऊपयोग होतो असे आढळून आले आहे. बरेचसे lactose मात्र ह्या पाण्यामधून जाते त्यामुळे lactose intolerant व्यक्तीनी मात्र याचे सेवन त्रास झाल्यास कमी प्रमाणात करावे.
याचाच आणखी एक अर्थ असा होतो की lactose intolerant व्यक्तींना whey वेगळे काढलेले पदार्थ म्हणजे चक्का/श्रीखंड, पनीर, लोणी आणि cheese हे B12 चे sources उपयोगी पडतात.
अर्थातच या पदार्थांमध्ये दुधापेक्षा फारच कमी प्रमाणात B12 असते. दुधाच्या प्रत्येक पदार्थाचा एक विशेष ऊपयोग आहे. म्हणुनच दुधापासून तयार केलेले सगळे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत.
Lactose intolerant व्यक्तींना एक साधा उपाय म्हणजे lactase enzyme च्या गोळ्या किंवा drops उपलब्ध आहेत ते वैद्यकीय सल्ल्याने नियमित घ्यावेत.
आणखी एक B12 चा महत्त्वाचा आणि हल्लीचा source म्हणजे दुधाची पावडर किंवा dairy whitener. हा दुधाचा concentrated form असल्याने यात B12 सुद्धा जास्त प्रमाणात मिळते.
(https://foodstruct.com/compare/milk-vs-powdered-milk) पण त्याचबरोबर lactose सुद्धा यात जास्त प्रमाणात असते त्यामुळे diabetes असलेल्या आणि lactose intolerant व्यक्तींनी या पासून दूर राहिलेले बरे.
आता पुढल्या post मध्ये आपण पुन्हा मूळ विषयाकडे म्हणजे आपल्याला B12 deficiency का निर्माण होते आणि त्याचे उपाय याबद्दल बोलुया.
-Gaurish Borkar

Comments

Popular posts from this blog

My next book is for all of you: Untold Nakshatra Jyotish (Fifth Edition)

New Book: Untold Planetary Transits -Simple Way to Accurately Predict Timing of Events

New Book : Untold Vaastu Shastra, Building Blocks of Prosperous and Joyful Home

Basic Course on Vedic Astrology (Free)

NLP: New Year Resolutions