Vitamins Part 3

 #Vitamin

आज आपण थोडेसे B12 च्या बद्दल थोडेसे समजून घेऊया. B12 हे एक पाण्यात विरघळणारे Vitamin आहे ज्यामध्ये मुख्यत्वे cobalt असते. Cobalt बरोबरची विविध compounds असल्यामुळे B12 ला cobaltamin सुद्धा म्हणतात. B12 अन्नातील प्रोटीनशी बांधलेले असते. B12 शरीरात शोषण्याची प्रक्रिया तोंडातच सुरू होते. आणखी B12 नंतर पोटातून शोषले जाते. सामान्यपणे प्रौढ व्यक्तीला 2.4 micrograms एवढे B12 रोज लागते.
गुरांमध्ये B12 खूप का असते हे समजण्यासाठी आपल्याला Ruminants म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. Ruminants म्हणजे मोठे चरणारे प्राणी जे मुख्यतः हिरव्या वनस्पतीपासून पोषणमूल्ये मिळवितात. याच्यामध्ये रवंथ करण्याचा भाग मुख्यतः येतो. यामध्ये वनस्पती किंवा cellulose fermentation करण्याचा भाग महत्वाचा आहे याला foregut fermentation असे म्हणतात. यामधूनच B12 व इतर पोषणमूल्ये खूप प्रमाणात तयार होतात. ही पोषणमूल्ये गुरांच्या fats मध्ये आणि दुधामध्ये ही येतात आणि त्यांचे दूध किंवा मांस खाणार्या इतर प्राण्यांना मिळतात.
याचा सरळ अर्थ असा जर गुरांना हिरवा पाला दिला तरच B12 निर्माण होईल. त्यामुळेच गुरांच्या दुधातील पोषणमूल्ये त्यांच्या आहारावर आणि विशेषत: हिरव्या चाऱ्यावर अवलंबून असतात. हीच पोषणमूल्ये गुरांच्या शेणात आणि गोमूत्रात फार मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळेच की काय आपल्याकडे अगदी थोड्या प्रमाणात गोमूत्र घेण्याची पद्धत सुरू झाली असावी आणि ती अतिशय योग्य असावी. अगदी चमचा भर गोमूत्राने सुद्धा आपली B12 ची गरज पूर्ण होईल.
हिरवा चारा खाणार्या गुरांचे शेण जर पिकांना घातले तर पिकांमध्ये सुद्धा हे B12 येते. (https://www.newindianexpress.com/.../rgcb-scientists...).
एका अभ्यासानुसार गेल्या पन्नास वर्षात भाज्यांच्यामधील विविध Vitamins 21 ते 37 टक्क्यांनी कमी झालेली आहेत तर minerals 14 ते 22 टक्क्यांनी कमी झालेली आहेत. याचे मुख्य कारण जमिनीचा कस हेच आहे.
यामुळे आपल्याला भाजीतून मिळणारी पोषणमूल्य कमी प्रमाणात मिळतात. हे Vitamin च्या कमतरतेचे एक प्रमुख कारण आहे.
B12 च्या दृष्टीने आणखी एक पदार्थ म्हणजे खरवस! प्रयोगातून असे सिद्ध झाले आहे की गाय व्यायला नंतर 16 व्या आठवड्यापर्यंत मिळणार्या दुधात B12 अतिशय जास्त प्रमाणात असते त्यामुळे खरवसाला B12 च्या दृष्टीने महत्व आहे.
आता आपली B12 ची गरज कशी पुर्ण करता येईल ते पुढच्या post मध्ये पाहू.

Comments

Popular posts from this blog

My next book is for all of you: Untold Nakshatra Jyotish (Fifth Edition)

New Book: Untold Planetary Transits -Simple Way to Accurately Predict Timing of Events

New Book : Untold Vaastu Shastra, Building Blocks of Prosperous and Joyful Home

Basic Course on Vedic Astrology (Free)

NLP: New Year Resolutions