Vitamins Part 5

 #Vitamin

मागे आपण पाहिले की गुरे हिरवा चारा खातात मग रवंथ करतात आणि तो चारा पोटात फुगून त्याचे foregut fermentation होऊन B12 निर्माण होते. नंतर हेच B12 गुरांच्या दुधामध्ये येते आणि आपल्याला मिळते.
आज आपण पाहूया की आपण दूध आणि दही रोजच्या आहारात घेऊन सुद्धा आपल्याला B12 कमी का पडते.
याचे पहिले कारण दुधच आहे. आपण जर दूध गवळ्या कडून घेत असाल आणि तुम्हाला B12 deficiency असेल तर दूध नक्की बदलून पहा. मागे आम्ही नवीन dairy मधुन दूध आणू लागलो आणि मला तोंड येऊ लागले म्हणुन ही गोष्ट dairy मालकाच्या कानावर घालून ते दूध बंद केले. काही दिवसांनी त्याने स्वतःच सांगितले की त्याने दुधाचा source बदलला कारण त्या दूधामध्ये problem होता. मला असा प्रॉब्लेम कुठल्याही पिशवीतील दुधात अजून आलेला नाही
दुसरे प्रमुख कारण digestion हे आहे. आपला flora किंवा पचनशक्ती जर योग्य नसेल तर अन्नातील जीवनसत्त्वाचे पुरेसे शोषण रक्तात होत नाही आणि यातून अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. म्हणुनच कदाचित आयुर्वेदात बरेचसे आजार पचनाशी संबंधित असतात असे म्हटले असावे.
जर तुम्हाला अगदी घट्ट किंवा फार पातळ stool असेल. दिवसातून एका पेक्षा जास्त वेळा किंवा 2 दिवसातून एकदा टॉयलेटला जात असाल तर आणि तुम्हाला Vitamin ची कमतरता भासत असेल तर तुमचा प्रॉब्लेम पचनाशी संबंधित असू शकतो. माझा असा अनुभव आहे की पचनचे आजार आयुर्वेदिक औषधे घेऊन बरे होतात तेवढे ते Allopathic औषधे घेऊन होत नाहीत. माझा Homeopathy वर विश्वास असला तरी पचनावर homeopathic औषधे कितपत परिणाम करतात याबद्दल मी फार सांगू शकणार नाही.
अन्नाचे fermentation होण्याची प्रक्रिया जरी आपल्या तोंडात सुरू होत असली तरी ती मुख्यतः मोठ्या आतड्यात होते. या प्रक्रियेतून आपल्याला कोणकोणती जीवनसत्त्वे मिळतात किंवा कोणते फायदे होतात याबद्दल आज विज्ञानाला पुरेशी माहिती नाही. (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/21992950/)
ही fermentation ची प्रक्रिया short chain fatty acids किंवा SCFA निर्माण करतात. SCFA weight gain आणि diabetes सारख्या आजारात महत्त्वाची भूमिका बजावतात. (https://www.healthline.com/.../short-chain-fatty-acids-101)
या fermentation process चा ऊपयोग आधुनिक वैद्यक शास्त्राला आता समाजाला असावा कारण आज काल Prebiotics आणि Prebiotics देण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे.
आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्याने fermentation ची प्रक्रिया बिघडते.
सगळ्यात साधे म्हणजे अतिशय तिखट किंवा हिरवी मिरची खाणे ज्यामुळे flora खराब होतो.
आज काल आपण अनेक packaged पदार्थ खातो. त्यातल्या बर्याच पदार्थांमध्ये preservatives असतात. एवढच काय आपण घरात तयार केलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा sodim benzoiate सारखी preservatives अगदी सहज घालतो. यामुळे fermentation च्या process वर परिणाम होतो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की Bacterias प्रत्येक खाद्यपदार्थांमध्ये असतातच आणि ते ecosystem maintain करण्याकरिता आवश्यक आहेत. त्यामुळे पूर्वी जे natural preservatives वापरायचे ते सोडून कोणतीही chemicals वापरणे पचना मला धोकादायक आहे. Natural preservatives म्हणजे साखर, तेल आणि मीठ. या 3 गोष्टींचे धोके जेवढ्या जोरात वैद्यकीय जगतात बोलले जातात तेवढ्या जोरात preservatives बद्दल बोलले जात नाही हे आश्चर्यकारक आहे.
गम्मत म्हणजे काही औषधे सुद्धा आपला flora खराब करतात.
उदाहरणादाखल काही औषधे सांगतो. आज काल आपण antibiotics अगदी सहज घेतो. ही औषधे सगळे Bacterias मारतात त्यात पोटातील उपयुक्त Bacterias सुद्धा मारले जातात आणि तोंड येते. याचे कारण म्हणजे B12 तयार होण्याची पोटातील प्रक्रिया बंद होते. पूर्वी doctors antibiotics बरोबर B12 च्या गोळ्या देत असत पण आता मात्र ते pre biotics किंवा Prebiotics देतात.
आता पहा diabetes मध्ये सगळ्यात सुरवातीला metformin देतात. हे metformin 2 गोष्टी करते. एक म्हणजे साखर शोषणाची प्रक्रिया कमी करते. याबरोबरच आणखी काही गोष्टी सुद्धा कमी शोषल्या जात असाव्यात. Metformin मुळे B12 absorption कमी होते याचा evidence उपलब्ध आहे. (https://www.aafp.org/afp/2004/0115/p264.html) तुम्हाला जर metformin सुरू असेल तर B12 ची कमी जाणवणे नैसर्गिक आहे. यात जर डॉक्टर दूध घेऊ नका असे सांगत असतील तर काही विचारायलाच नको. या B12 deficiency चा शाकाहारी असण्याशी काहीही संबंध नाही.
Metformin चे side effects मुख्यतः floral खराब करणारे आहेत. ते म्हणजे Upset stomach, gases आणि diarrhea. याचबरोबर kidney चे विकार असणार्यांनी हे औषध घेऊ नये असे सांगितले आहे (https://www.goodrx.com/.../metformin-how-does-it-work...)
तिसरे एक mineral B12 absorption कमी करते ते म्हणजे calcium. आपण calcium च्या गोळ्या म्हणजे काय ते आधी पाहूया. Calcium supplements हे calcium carbonate असते. Calcium carbonate म्हणजे आपला पानाला लावतात to चुना! आमच्या गावी जवळ जवळ सगळ्या शेतात काम करणार्या स्त्रिया पान खातात आणि त्याला चांगला चुना लावतात. आज काल शहरात अनेक स्त्रिया calcium supplements घेतात. मागे मी घरी नागवेल लावली आणि भरपूर चुना लावून रोज अर्धे पान खायला सुरुवात केली आणि शंका आली की calcium आणि B12 चा काही संबंध आहे की काय. आश्चर्य म्हणजे होय calcium b12 absorption कमी करू शकते.
calcium आणि विटामिन्स एकत्र घेतले तर मात्र vitamins शरीरात कमी शोषले जातात.
पण calcium deficiency असेल तर सुद्धा B12 absorption कमी होते असे सिद्ध झाले आहे. म्हणुनच की काय आपल्याकडे नुसते पान न खाता पानाला चुना लाऊन आणि कात घालून पान खातात. (https://www.livestrong.com/.../307495-is-b12-needed-for.../)
त्यामुळे calcium deficiency तर शरीरात असता कामा नये पण vitamins आणि calcium एकत्र सुद्धा घेऊ नये. (https://www.mayoclinic.org/.../calcium.../faq-20058238).
आता पुढच्या पोस्ट मध्ये B12 करता घ्यायचा आहार या बद्दल बोलुया.
- Gaurish Borkar

Comments

Popular posts from this blog

My next book is for all of you: Untold Nakshatra Jyotish (Fifth Edition)

New Book: Untold Planetary Transits -Simple Way to Accurately Predict Timing of Events

New Book : Untold Vaastu Shastra, Building Blocks of Prosperous and Joyful Home

Basic Course on Vedic Astrology (Free)

NLP: New Year Resolutions