Posts

Showing posts from January, 2018

Featured Post

पद्मावती

Image
पद्मावती(आताचा पद्मावत) चित्रपटाच्या निमित्ताने गेले काही दिवस जे काही समोर येतंय ते कवितारुपात मांडलय....ह्या चर्च्यांच्या पलीकडे जाऊन आमचा इतिहास आम्हाला नेमका समजला पाहिजे.
फिरली का त्यांची मति दिग्दर्शीला त्यांनी पद्मावती जोहर होते का ती गेली सती? आम्ही चर्चितो पद्मावति
निषेधार्थ कोणी उतरती रान पेटवती रस्तोरस्ती ते जाळती, आम्ही पोळतो का रक्षितो आम्ही संस्कृती?
इतिहासात छेडछाड ती अभ्यासक शोधून काढती सत्य काय आम्हां ना कळे आम्ही शोधतो(*गुगलतो) पद्मावती
कुणी पाठराखण्या धावती कलेवर बंधने घालावी किती? आम्ही वाचतो आम्ही ऐकतो आम्ही बोलतो पद्मावती
मथळ्यावर मथळे झळकती वैचारिक त्यांस येता भरती खुमखुमीत चर्चा रंगती किती