मामी आजी - आठवण

आज थोडी personal पोस्ट लिहितेय आणि त्याबरोबर तिच्यावर पूर्वी एकदा केलेली कविता पोस्ट करतेय. मामी आजी ही खरतर नात्याने माझी आजेसासू(आजेसासूबाई).... माझ्या सासूबाईची मामी.पण मी तिला कधीच अहो-जावो केलं नाही , ती माझीही मामी आजीच होती.आज तिची खूप आठवण आली कारण मागच्या दिवाळीत गोव्याला मामीआजीबरोबर होतो आणि ह्या वर्षी ती दिवाळीला नसेल असे वाटलंही नव्हते. तिची आणि माझी पहिली भेट माझ्या लग्नात महणजे २००७ साली झाली...मी नऊवारी साडी नेसायची ठरवल्यापासून मला सासूबाई सांगत होत्या.. अग गिरीजा आणि मामी तुला नेसवेल नऊवारी..तू काळजी करू नको... पण मला नात्याने आजेसासू असणारी हो कोणीतरी आजी आणि तिच्याकडून नऊवारी नेसायची म्हणजे थोडे अवघडल्यासारखे वाटत होते..त्याचीच काळजी जास्त वाटत होती :) पण नवीन असल्याने मी काही बोलले नाही.. मग मामी आजीला लग्नाच्या आदल्या दिवशी पहिले, उंचपुरा बांधा, देखणा चेहरा असलेली, पांढऱ्या रंगाच्या नऊवारी मधली तिची प्रेमळ मूर्ती... ती माझ्याशी बोलली आणि इतके छान वाटले की त्यानंतर ती माझीही मामी आजीच होऊन गेली अगदी कायमची........मग हक्काने इतकी वर्ष मी गोव्याला देवीला