बाळंतपण

नऊ मासाच्या प्रतिक्षेनंतर पाहिलं त्याचं मुख आई म्हणून अनुभवलं मी ते जगावेगळ सुख ते रडलं आणि मी हसले असा होता तो क्षण आई म्हणाली, पूर्ण झाला बाळंतपणाचा पण वाटलं राजा राणीचा पूर्ण झाला आता संसार काव्यात वगैरे बोलायचे तर त्याला आली बहार पण दोनच दिवसात मांडलेलं सगळं गणित फसतं कळून चुकत आई होणं इतकं सोपं नसत कित्ती दिले तरी अपुरेच पडतात त्याला चौवीस तास सेंट आणि deo कुठले, नुसता शी आणि शु चा वास हक्काचं माहेरपण आईबाबांनी ठेवलेली बडदास्त सगळ्यांना हे बाळ गोड पण मला मात्र देत त्रास कधी लागते उचकी तर कधी धरत श्वास' कधी बिनसतं पोट तर कधी होतो gas जेवण केलय आज आईने आवडीचे खास पण सूर ह्याने काढला कि माझा अडकतोय घास त्यातच इकडून तिकडून सूचनांचा पाऊस हे करून बघ त्याला आणि हे नको खाऊस डोक बांधून घे जरा कित्ती आहे पाऊस दिवे लागणी झाली आता बाहेर नको जाऊस कुणी म्हणे लागली असेल त्याला दृष्ट काढून टाक एकदाची इडा पिडा होऊ देत नष्ट सांभाळ बाई त्याला खूप आहेत infection देऊन आणलंस का ग त्याला वेळेत injection बाटली नको तिला च...