Posts

Featured Post

Book : Untold Vedic Astrology is Live

Image
Vedic Astrology is an advanced science. It is based on many principles in quantum physics. This book connects common ideas between quantum physics and Vedic Astrology. This will help astrologers to understand key principles better and help them apply them with confidence. The book connects Vedic astrology with 1.Triune brain theory 2.Multiple intelligence theory 3.Quantum physics 4.Fetus development 5.Body clock 6.Modern astronomy It also explains 1.Important principles for analysis 2.Building blocks of Vedic astrology 3.How significations of houses and signs were decided 4.9 various states of planets 5.Planetary war, conjunction and associaltion of planets 6.How to analyse Rahu and Kethu And much more Here are reviews from readers:
Price of the book is Rs. 230 in Indian subcontinents. (Postage extra). Digital copy is available on Google Play.

वंशाचा दिवा

Image
तसे सामाजिक विषयावर मी खूप लिहिल नाहीये  पण हा विषय मला कधीतरी  मांडायचा होताच. कारण तो जवळपासच्या प्रत्येक घरात कधी उघड तर कधी आडून दिसतो आणि जेव्हा दिसतो तेव्हा मला प्रचंड बोचतो.तो अगदी थोडक्यात ह्या कवितेत सुचला असे वाटतंय.


ह्या कवितेतील " छोट्या तिला" देखील जेव्हा हा  फरक कळतो, तेव्हा ती स्त्री मुक्तीवादी वगैरे होत नाही पण दु:खी नक्कीच होते कारण तिच्या भावनाविश्वात उलथा पालथ होते कायमची.......
मी कळती झाल्यापासुनी मज वाटे त्याचा हेवा जरी लेक मीही लाडाची तरी तोच "वंशाचा दिवा"
ठाऊक नव्हते मजला हे गणित आहे काय जेव्हा प्रेमाने दोघांना थोपटायची माय
आजोबांची तर लाडाची  मी दुधावरली साय जोवरी दिसले नव्हते त्याचे पाळण्यातले पाय
घरा आनंद घेऊन आले गोजिरेसे ते नवजात अन आजी बोलून गेली  आज स्वर्गास टेकले हात
लगबगीने उजळली तिने  मग देवापुढली वात अन पुसायचे मज जे होते ते प्रश्न राहिले आत
स्वागतास त्याच्या मी सगळ्यात पुढे दारात मज ठाऊक नव्हते तेव्हा "मुलगा" ही वेगळी जात
तसे चटकन कळतच नाही "आधुनिक" अशा घरात खायचे अन दावायचे जिथे वेगळे असती दात
लेक झाली म्हणु…

होळी

Image
उधळीत रंग इतुके तू खेळतोस होळी रंग कोणता मी ल्यावा रीतीच माझी झोळी
रंग लालचुटुक शोभे जितुका गुलाबास तितुकाच आवडे मज जो रंग लाल मातीस
पिवळा धमक पाहावा ना ना फळा फुलांत अन मनात  साठवावा समईतला प्रकाश
नारिंगी रोज सजतो पूर्वेकडे पहाटे फळ रसदार नारिंगी ते पाहताच गार वाटे
शुभ्र धवल शोभतो बघ, उंच हिमशिखरात खिडकीतुनी पाहावा पुनवेच्याही चंद्रात
मज भावते निळाई अथांग त्या नभाची मखमल लपेटलेल्या त्या मोरपिसाऱ्याची
पावसात नाहलेली ती हिरवीगार अवनी जणू तृप्त जाहलेली पर्जन्य अमृत पिउनी
श्याम तो दिसावा मिटल्या डोळा अंतरात लपेटून घ्यावी मग मिट्ट काळोखी रात

असे रूप ते दिसावे मज नित्य सांजवेळी
अन भरून जावी माझी रितीचं ती झोळी

मी नित्य अनुभवावी ही तिचं तुझी होळीकल्याणी बोरकर
मुलाकात

Image
हिंदी कविता आहे मुलाकात..


ये मुलाकात है  किसीसे ...जिसे आप रोज मिलते हो .....पहचानते हो .......पर मिलके भी मिल नही पाते ......बोलते तो हो पर मुलाकात नही होती......कविता नीचे दिये गये लिंक पे सून सकते हो

Headphones recommended for great experience.


https://soundcloud.com/prosperity-n-joy/mulakat

 कल्याणी  बोरकर


पाऊस

Image
.....खरतर प्रत्येक वर्षीच तो येतो पण प्रत्येक पावसाळ्यात पावसाचे  पहील रूप पाहणे हे खूप सुंदर असतं.
त्याची वाट पाहणे, त्याने येण, आणि येताना त्याला  पहात पहात कविता लिहिणं म्हणजे खूप भारी वाटते
अशीच पहिल्या पावसाची नवीकोरी पहिली कविता ...कशी वाटतेय नक्की सांगा आणि खाली दिलेल्या लिंक वर ऐकताही येईल,


Listen here
नको नकोसेच झाले बघ डोईवर ऊन वाटे सोडेल का आभाळ आज त्याचे मौन
आग ओकणाऱ्या झळा भिनती रोमातून तितक्यात ऐकू आली कानी ओळखीची धून
पक्षी झाले सैरभैर वारे वाहिले फिरून आणि क्षणात दिसला तो येताना दुरून
ठरवले पहावे आज त्यावरी रागावून थांबू  नयेच स्वागता जावे पाठ फिरवून
किती रे बघावी तुझी एखाद्याने वाट डोळे सुकले रे माझे कोरडा झाला काठ
पण गाठलेच त्याने मला जाताना रागवून आणि मनवले असे त्याच्यातच भिजवून'
झाले पाऊस पाऊस मग डोईचे ते ऊन काळजात राहिला फक्त पाऊस भरून
असे असावेच काही ज्यात जाता यावे विरून अन कशानेतरी काळीज असे यावेच भरून
जेव्हा नकोसे होईल मग कसलेही ऊन तेव्हा बरसावे आपण पाऊस आपला होऊन तेव्हा बरसावे आपण पाऊस आपला होऊन

कल्याणी बोरकर

गझल

Image
एक गझल लिहितेय.ही गझल म्हणजे आर्त प्रेमाची एक छोटी गोष्ट आहे.थोडी एकतर्फी प्रेम सांगणारी.छळू नको रे दु:ख मजला फार झाले अश्रूही बघ अतासे फरार झाले
नजरा तुझ्या वाचुनी मी सर्व समजायचो नजरेतुनी बोलणे आता हे फार झाले
उभ्या राहिल्या कित्येक भिंती अपुल्यामध्ये मी त्या हरेक भिंतीमधील दार झाले
तुला दिसलेच नाही मी च्या पल्याड काही अन माझ्या मनी उगीच दोनाचे चार झाले
तुज पाहण्यास  फिरणे असे अवती भवती अन असणेही माझे बघ तुझी तक्रार झाले
मी तशी तुजला कधी कळलेच नाही अन प्रेमही माझे मग कसे लाचार झाले
समजायचे समजून गेले मी शेवटी अन बोलणेही आपुले, व्यवहार झाले
तोडिले मग बंध सारे मी निश्चयाने लोक म्हणती अता मी, हुशार झाले
म्हणशी आता तू कळले तुला ते प्रेम माझे पण मीचं आज त्या प्रेमातला नकार झाले
प्रेम कैसे मी पुन्हा फिरुनी करावे काळजावर बघ किती हे वार झाले
छळू नको रे दु:ख मजला फार झाले अश्रूही बघ अतासे फरार झाले

कल्याणी बोरकर
सांग कोणता खरा

Image
दोघेही माझाच चेहरा मग कोणता आहे खरा?
आवरतो सजतोही छान हलवितो तालात मान उसनेच आणून अवसान परी करितो सोहळा साजिरा सांग कोणता आहे खरा?

नात्यांची साऱ्या बांधून मोट मी शोधतो प्रेम घोट घोट जरी माझिया मनी वाहतो अविरत प्रेमाचा झरा सांग कोणता आहे खरा?

मी स्वावलंबी अन मी स्वतंत्र एकाला चलो माझाही मंत्र मग लागता ठेच चालता का शोधतो मी आसरा सांग कोणता आहे खरा?

जीवनास भलताच वेग हा वेग बघ आणतो उद्वेग परी व्यस्त आहे सांगता ठेवतो चेहरा हासरा सांग कोणता आहे खरा?
लाख इच्छा जपुनी मनी मी ओढतो जीणे निशदिनी परी मागतो वैराग्य दे मी भेटू जाता मंदिरा सांग कोणता आहे खरा?

मेंढरांची गर्दी अफाट तीच ती रटलेली वाट मी चालू जाता मार्ग वेगळा होतो मनातून बावरा सांग कोणता आहे खरा?
कल्याणी बोरकर


कविता सुचतेवेळी

Image
कविता सुचतेवेळी
शब्दांनी भरून जाता कल्पकतेची झोळी, अलगद ओघळती मग अशाच काही ओळी नसतोच तो कोणाचा ती कविता सुचतेवेळी
कधी चंद्र तारे आभाळी,कधी रात्र गंभीर काळी ती दिवसरात्री सुचते,ती सुचते वेळीअवेळी
मुक्याने अश्रू ढाळी,चिंताही दिसते भाळी वेदनेत त्याने लिहिता, अश्रूंची होते होळी
शब्दांची बांधून मोळी,लिहिता काही ओळी कधी होते ती कविता, कधी होते एक चारोळी
काव्यातून काही जाळी, कधी कोणा ओवाळी तो खरेखुरे ते लिहितो, वाजो न वाजो टाळी
नसतोच तो कोणाचा ती कविता सुचतेवेळी
नसतोच तो कोणाचा ती कविता सुचतेवेळी
कल्याणी बोरकर