Posts

Showing posts from March, 2022

Vitamins Part 5

  #Vitamin मागे आपण पाहिले की गुरे हिरवा चारा खातात मग रवंथ करतात आणि तो चारा पोटात फुगून त्याचे foregut fermentation होऊन B12 निर्माण होते. नंतर हेच B12 गुरांच्या दुधामध्ये येते आणि आपल्याला मिळते. आज आपण पाहूया की आपण दूध आणि दही रोजच्या आहारात घेऊन सुद्धा आपल्याला B12 कमी का पडते. याचे पहिले कारण दुधच आहे. आपण जर दूध गवळ्या कडून घेत असाल आणि तुम्हाला B12 deficiency असेल तर दूध नक्की बदलून पहा. मागे आम्ही नवीन dairy मधुन दूध आणू लागलो आणि मला तोंड येऊ लागले म्हणुन ही गोष्ट dairy मालकाच्या कानावर घालून ते दूध बंद केले. काही दिवसांनी त्याने स्वतःच सांगितले की त्याने दुधाचा source बदलला कारण त्या दूधामध्ये problem होता. मला असा प्रॉब्लेम कुठल्याही पिशवीतील दुधात अजून आलेला नाही दुसरे प्रमुख कारण digestion हे आहे. आपला flora किंवा पचनशक्ती जर योग्य नसेल तर अन्नातील जीवनसत्त्वाचे पुरेसे शोषण रक्तात होत नाही आणि यातून अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. म्हणुनच कदाचित आयुर्वेदात बरेचसे आजार पचनाशी संबंधित असतात असे म्हटले असावे. जर तुम्हाला अगदी घट्ट किंवा फार पातळ stool असेल. दिवसातू

Vitamins Part 2

  #Vitamin गेल्या post वर एका ताईंनी Comment केली की 'B12 च्या कमतरतेमुळे शाकाहारी असणे गुन्हा वाटायला लागलय.' म्हणुन आज थोडे B12 बद्दल बोलुया. B12 deficiency कडे पाहताना आपल्याला 2 3 प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे जर का मांसाहारी पदार्थातून Vitamins जास्त मिळतात तर अमेरिकेत गल्लो गल्ली Vitamins ची दुकाने कशी काय आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे भाजीपाला खाऊन राहणाऱ्या प्राण्यांना म्हणजे गाई गुरांना हा प्रश्न का भेडसावत नाही. आणि तिसरा प्रश्न म्हणजे हा प्रश्न हल्लीच का उद्भवला. अमेरिकेत विकत मिळणार् ‍ या निरनिराळ्या पदार्थांमध्ये Vitamins आणि minerals add करून ते पदार्थ विकण्याची पद्धत आहे. म्हणजे ते Vitamins च्या गोळ्या घ्यायच्या ऐवजी असे पदार्थ खातात. याला fortified food असे म्हणतात. याबद्दल आणखी माहिती इथे मिळेल ( https://www.healthline.com/.../fortified-and-enriched-foods ). दुसरी गोष्ट म्हणजे benchmarks. आपल्या भाषेत Benchmarks म्हणजे Normal Range. एका अभ्यासानुसार जर B12 हे 200pg/ml च्या खाली असेल तर कमी आहे असे मानले आहे आणि 200pg/ml ते

Vitamins Part 3

  #Vitamin आज आपण थोडेसे B12 च्या बद्दल थोडेसे समजून घेऊया. B12 हे एक पाण्यात विरघळणारे Vitamin आहे ज्यामध्ये मुख्यत्वे cobalt असते. Cobalt बरोबरची विविध compounds असल्यामुळे B12 ला cobaltamin सुद्धा म्हणतात. B12 अन्नातील प्रोटीनशी बांधलेले असते. B12 शरीरात शोषण्याची प्रक्रिया तोंडातच सुरू होते. आणखी B12 नंतर पोटातून शोषले जाते. सामान्यपणे प्रौढ व्यक्तीला 2.4 micrograms एवढे B12 रोज लागते. गुरांमध्ये B12 खूप का असते हे समजण्यासाठी आपल्याला Ruminants म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. Ruminants म्हणजे मोठे चरणारे प्राणी जे मुख्यतः हिरव्या वनस्पतीपासून पोषणमूल्ये मिळवितात. याच्यामध्ये रवंथ करण्याचा भाग मुख्यतः येतो. यामध्ये वनस्पती किंवा cellulose fermentation करण्याचा भाग महत्वाचा आहे याला foregut fermentation असे म्हणतात. यामधूनच B12 व इतर पोषणमूल्ये खूप प्रमाणात तयार होतात. ही पोषणमूल्ये गुरांच्या fats मध्ये आणि दुधामध्ये ही येतात आणि त्यांचे दूध किंवा मांस खाणार् ‍ या इतर प्राण्यांना मिळतात. याचा सरळ अर्थ असा जर गुरांना हिरवा पाला दिला तरच B12 निर्माण होईल. त्यामुळेच गुरांच्या दुधा

Vitamins Part 1

#Vitamin मागच्या काळात ब्राह्मण शुद्ध शाकाहारी या ग्रुप वर बी विटामिन ची कमतरता या बद्दल काही पोस्ट आल्या होत्या आणि माझ्या बायकोने मला माझा अनुभव इथे शेअर करायला हवा असं सांगितलं म्हणून ही पोस्ट लिहितोय. मी लहानपणापासून खूपच लठ्ठ होतो म्हणजे साधारणपणे चौथीत असताना माझं वजन 48 किलो होतं. गोव्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्यानंतर दिवसाला दहा बारा आंबे आणि बाकी सगळा मेवा खाऊन अंगावर भरपूर फोड यायचे आणि त्यावेळी कोणी याचं कारण सांगायच्या ऐवजी आम्हाला नेहमी खाण्याकरता प्रोत्साहित करत असत. नंतरच्या काळामध्ये साधारण सातवी-आठवीत गेल्यानंतर भरपूर सायकल चालवल्यामुळे माझं वजन अगदी खूपच कमी झालं आणि त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण होऊन नोकरी सुरू झाल्यानंतर ते पुन्हा वाढलं. मी आत्ता पर्यंत दोन तीन वेळा विविध पद्धती वापरून वजन कमी केलं आहे. साधारणपणे 2006 साली Restricted Diet वर असताना आणि त्याच्या आधी सुद्धा वेळोवेळी मला मला तोंड यायचं आणि जेव्हा मी 2007 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला गेलो त्यावेळी तिथे गल्लोगल्ली ही विटामिन सप्लीमेंट ची दुकान पहिली. तेव्हा हा काय प्रकार आहे याबद्दल माझी उत्सुकता

Vitamin Part 4

  #Vitamin मागच्या लेखामध्ये 2 महत्वाचे प्रश्न आले. एक lactose intolerance बद्दल आणि दुसरा दूध आणि मधुमेह याच्या संबंधाबाबत. साध्या भाषेत सांगायचे झाले तर Lactose intolerance म्हणजे दूध न पचणे. Lactose ही एक प्रकारची साखर दुधात असते. आपल्या शरीरात lactase नावाचे enzyme असते जे Lactose चे विघटन करायला मदत करते. ज्यांच्या शरीरात lactase चे प्रमाण कमी असते त्यांच्या पोटात Lactose चे विघटन होत नाही आणि ते मोठ्या आकड्यात जाते व त्यामुळे गॅसेसचा किंवा dysentery चा त्रास होऊ शकतो. ( https://www.webmd.com/.../digestive-diseases-lactose... ) अगदी सामान्य माणसाला सुद्धा भरपूर दूध प्यायल्याने हा त्रास होऊ शकतो. मी स्वतः 7 लिटर flavored दूध एकाच दिवसात पिऊन याचा अनुभव घेतला आहे. lactose intolerance असलेल्यांना दूध अजिबात चालत नाही असे नाही त्यामुळे आपल्याला एका वेळी किती दूध चालते हे त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून ठरवले पाहिजे. अगदी एक थेंब सुद्धा दूध चालत नाही अशा व्यक्ती भारतात फार कमी असाव्यात. आता diabetes बद्दल बोलू. दुधामध्ये Lactose आणि galactose अशी 2 carbohydrates असतात ज्यापासून साखर तयार